आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
ग्लास माझा काठो काठ भरून घेणार आहे
जुन्या सगळ्या दिवसांसाठी रडून घेणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
जहाल मवाळ गोडसे गांधी
मित्र आपले छंदी फंदी
Thirty First ची साधून संधी
आज माजवू अंदाधुंदी
धाक धूक थोडं होणार आहे ,पण घेणार म्हणजे घेणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
धुंद ,मंद ,आंबट ,धुरकट
बार मधली मादक सृष्टी
ए. सी. मध्ये बसल्या बसल्या
हळूच रमतील गप्पा गोष्टी
बोलका मी ही होणार आहे ,ऐटीत order देणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
कसली भीड कसली लाज
सज्जनतेचा सारा साज
पेल्यामध्ये
उतरवून
आज
म s स्त मौला होणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
(ओता रे ओता )
आठवून साऱ्या जुन्या आयटम
पहिला पेग "top to bottom "
(cheers!)
पहिली स्साली सोडून गेली
दुसरी भोळी उगाच भ्याली
तिसरी च्यायला बायकोच झाली
चौथी म्हणजे माझी साली !
आढे वेढे घेणार नाही , सगळं खरं सांगणार आहे,
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू
आज
पिणार आहे
यश -अपयश सारंच vague
त्याच्या साठी दुसरा पेग
मागवून ठेव लगेच तिसरा
life चा पार झालाय कचरा
पाचवा
सातवा
सहावा
आठवा
मागोमाग लगेच पाठवा
cock-tail भारी करणार आहे, बेफाम होऊन पिणार आहे,
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
"एवढ्यातच अक्कराss वाजले भाई ?
अजून सिग्रेट कशी पेटली नाही ?"
deeeep कश ओढणार आहे...
डोळे मिटून घेणार आहे..........
ग
र
ग
र
त्या
मग
भो व ऱ्या म ध्ये
क्षणभर बुडून जाणार आहे
सेंटी-बिंटी होणार आहे, मुकेश-फिकेश गाणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
“आत्ता कस्सं मस्स्त वाटतंय !, सा sला सगळंच double दिसतंय... ”
“आयुष्याची कर्मकहाणी तुला सांगतो ऐक रे भावा... ”
“चखणा सारा तुम्हीच खावा, मला अजून एक पेग हवा ”
Dialogues भारी मारणार आहे ,माहौल करून सोडणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज
पिणार आहे
अटक मटक चवळी चटक
चल रे पांडू साईडला वटक
फेकून थोटूक करीन चेटूक
काय रे *** बघतोस टुकटुक
मोडून मुंडी मुरगळून टाकीन
ash tray मधे चुरगाळून टाकीन
वैताग बाहेर काढणार आहे , भैन*द माद**द म्हणणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू
आज
पिणार
आहे
तुला माझी शप्पथ भाऊ
अजून एक पेग घेऊ
स्टेशनवरती भुर्जी खाऊ
झालाच बार बंद तर
मागच्या दाराने बाहेर जाऊ
टल्ली टल्ली होणार आहे , वरतून पार्सल नेणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
नंतर पान खाणार आहे,
चटणी चमन रोजचंच आहे , १२०-३०० मागवणार आहे
बरळत
बरळत
बोलता
बोलता,
झुलत
झुलत
चालता
चालता,
मधेच थांबून रस्त्यावरती
आयुष्याच्या तोंडावरती
'पच्चाssक्'-
-कन् थुंकणार आहे
उमाळे गिळून घेणार आहे, जरा डोळे टिपणार आहे,
नंतर
गाढ झोपणार आहे,
ठार मरून जाणार आहे
सकाळी मात्र उद्या मी
पुन्हा कंबर कसणार आहे!
नव्या वर्षाचा गालगुच्चा घेऊन
"काय रे बबड्या !" म्हणणार आहे!
हे सगळं पुढचं पुढे, पण
आजचा प्लान (लई भारी ) जमणार आहे
संध्याकाळ पर्यंत थांबतंय कोण
दुपारीच बैठक रंगणार आहे
कारण
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे.
ग्लास माझा काठो काठ भरून घेणार आहे
जुन्या सगळ्या दिवसांसाठी रडून घेणार आहे
आयुष्यात पहिल्यांदाच मी
दारू आज पिणार आहे
(टीप - कविता हेच आग्रहाचे निमंत्रण समजावे )