( स्थळ: UPSC चे क्लासेस चालवणाऱ्या सरांचे office )
ओळखलंत का सर मला?
ऑफिसात आला कोणी
चेहरा होता मरतुकडेला, डोळ्यामध्ये पाणी
क्षणभर बसला नंतर हसला,बोलला वरती पाहून
कलेक्टर व्हायचं माझं स्वप्न गेलं अर्धवट राहून
आयुष्याची चार वर्षे परीक्षेसाठी घातली
होती नव्हती तेवढी मी, सगळी पुस्तके वाचली
गर्लफ्रेंड तुटली , नोकरी सुटली, होते नव्हते गेले
सासऱ्याकडून उधारी घेणे माझ्या नशिबी आले
नवीन विषय घेऊन सर यंदा पुन्हा लढतो आहे
पुण्यातून पास होत नाही, दिल्लीच्या गाडीत चढतो आहे
कपाटाकडे हात जाताच हसत हसत उठला
नोट्स नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला
खिशात नाही पैसा आणि खायला नाही दाणा
अजूनही परीक्षा देतच आहोत, आम्हीच येडे म्हणा !