काल मला एक स्वप्न पडलं! स्वप्नात माझ्या मुलाच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होतं. डॉक्टर नरेंद्र जाधावांकडून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या त्याच्या पुस्तकाचं नाव होतं-----------"......नायतर आमचा बाप, आणि आम्ही! "
Monday, 2 May 2011
ग्राफिटी
..अशावेळी, रात्र निवत असताना मेंदूमधल्या आदिसुक्तांचा जागर सुरु होतो,
मग साजूक घरंदाज नितळ कान्तीपेक्षा,
उन्हात रापून जरगट झालेल्या आदिवासी तरुणीची त्वचा
अधिक मादक वाटायला लागते आणि
संस्कार म्हणून मनावर गिरवल्या गेलेल्या बाराखड्या,
पब्लिक toilet मधल्या ग्राफिटीसारख्या वाटायला लागतात....
गम्मत म्हणजे...
वळचणीत सापडलेल्या जुन्या वहीतल्या माझ्याच कविता मला पोरकट वाटायला लागल्यात.
गम्मत म्हणजे हल्ली जवळचे मित्रही तू 'mature' झालास असं म्हणायला लागलेत!
या वाटा कुणाला सांगणार तर नाहीत?
फार पूर्वी मागे सोडलेल्या किनार्यांकडे परत जाताना आज मन कावरंबावरं होतंय.
तेव्हा तर गलबतेही नांगरून ठेवली नव्हती, आता भरकटली असतील कुठल्याकुठे.
काही वाटा मला विसरल्यात...मी काही वाटांना विसरलोय.
वाटांच्या या जंजाळात 'आपण हरवलोयत' हे मान्य करायचं म्हटलं की मन रडवेलं होतं,
कुठलेतरी प्राचीन उमाळे दाटून येतात,
आणि जरासं रडून घ्यावं म्हटलं तर भीती वाटते....
या वाटा कुणाला सांगणार तर नाहीत?
स्वर्गात तुतेनखामेन आणि अब्राहम मास्लोचे भांडण
आज पहाटे पहाटे स्वर्गात तुतेनखामेन आणि अब्राहम मास्लोचे कडाक्याचे भांडण झाले म्हणे!
तुझा पिर्यामिड मोठा की माझा पिर्यामिड मोठा यावरून!
तुतेनखामेन म्हटला ,"माझा पिर्यामिड इतका उंच आहे कि त्याचे टोक पहाण्यासाठी मान ही अशी वर करावी लागते"
मास्लो म्हटला ," माझा पिर्यामिड इतका उंच आहे कि त्याचे तर वरचे टोकच दिसत नाही"
तुतेनखामेन म्हटला "माझ्या पिर्यामिडसाठी हजारो लोक वीस वर्षे राबत होती".
मास्लो म्हटला "माझ्या पिर्यामिडसाठी तर अक्खी मानवजात करोडो वर्षांपासून राबत आहे"!
तुतेनखामेन म्हटला "माझा पिर्यामिड दस्तुरखुद्द फराहोच्या प्रेतावर उभारलाय".
मास्लो नम्रपणे म्हटला "जहांपनाह! माझा पिर्यामिड मानवी गरजांचा पिर्यामिड आहे , तो तर जिवंत माणसांमधून चालती बोलती प्रेतं उभी करतो"!
(...आणि यानंतर फराहो "ममीईईईईई" करत रडत सुटला म्हणतात! )
लहानपणी गावाकडे...
लहानपणी शाळेच्या पुस्तकात वाचलेले चिऊ-काऊ शोधून सापडत नाहीत , अजूनही.
लहानपणी गावाकडे चिमण्यातरी दिसायच्या, खूप.
आता त्या चिमण्यापण कुठे हरवल्यात, कोण जाणे.
आता तर गावाकडे पण जिकडे- तिकडे कावळे आणि गिधाडेच दिसायला लागलीत, मुंबईतल्यासारखी.
.....आणि परवा गावाकडे जुन्या बसस्टण्डसमोरच्या टपरीवर कुणीतरी बोलत होतं - " आता खेडीपण सुधारत चालली आहेत ".
"अण्णा हजारे! बेंचवर उभा रहा."
काल मला पुन्हा एक स्वप्न पडलं. यावेळी स्वप्नात महात्मा गांधी आले. तेही चक्क शाळामास्तर बनून!
बापू मास्तर एका विद्यार्ध्याचे प्रगतीपुस्तक बघून म्हणाले- "अण्णा हजारे! बेंचवर उभा रहा."
बापू मास्तर एका विद्यार्ध्याचे प्रगतीपुस्तक बघून म्हणाले- "अण्णा हजारे! बेंचवर उभा रहा."
जंतरमंतरसमोर वर्ग भरला होता.
सर्वात समोरच्या बाकावर नेहरू, पट्टाभी सारखे होतकरू विद्यार्थी बसले होते.
मधल्या बाकांवर विनोबा, जयप्रकाश वगैरे गंभीर, तर सर्वात मागे वल्लभ पटेलसारखे गुंड विद्यार्थी बसले होते.
मधेच कुठेतरी कु.सरोजिनी ,कु. कमला ई. मुली वेण्या घालून बसल्या होत्या.
बापू पुन्हा ओरडले-" अण्णा हजारे! बेंचवर उभा रहा."
अण्णा बेंचवर उभे राहिले.
हातातली छडी उगारीत आणि प्रगतीपुस्तकात बघत बापू म्हणाले-
"अण्णा, you are a bright student. you could make a great student indeed.
But do you know your greatest drawback ?
YOUR PERFORMANCE IS VERY SPORADIC,
"अण्णा, you are a bright student. you could make a great student indeed.
But do you know your greatest drawback ?
YOUR PERFORMANCE IS VERY SPORADIC,
YOU LACK CONSISTENCY!"
आणि अन्नाची फजिती पाहून सोनिया नावाची एक बॉब कट वाली new admission खाली मान घालून खुदूखुदू हसायला लागली!
Subscribe to:
Posts (Atom)