Monday, 2 May 2011

या वाटा कुणाला सांगणार तर नाहीत?

फार पूर्वी मागे सोडलेल्या किनार्यांकडे  परत जाताना आज मन कावरंबावरं होतंय.
तेव्हा तर गलबतेही नांगरून ठेवली नव्हती, आता भरकटली असतील कुठल्याकुठे.
काही वाटा मला विसरल्यात...मी काही वाटांना विसरलोय.
वाटांच्या या जंजाळात 'आपण हरवलोयत' हे मान्य करायचं म्हटलं की मन रडवेलं होतं,
कुठलेतरी प्राचीन उमाळे दाटून येतात,
आणि जरासं रडून घ्यावं म्हटलं तर भीती वाटते....
या वाटा कुणाला सांगणार तर नाहीत?   

1 comment:

  1. oh man! it slaps straight in face! its difficult to admit that one is lost!

    ReplyDelete