Monday, 2 May 2011

लहानपणी गावाकडे...

लहानपणी शाळेच्या पुस्तकात वाचलेले  चिऊ-काऊ  शोधून सापडत नाहीत , अजूनही. 
लहानपणी  गावाकडे  चिमण्यातरी दिसायच्या,  खूप.
आता त्या चिमण्यापण  कुठे हरवल्यात,  कोण जाणे.
आता तर गावाकडे  पण जिकडे- तिकडे  कावळे आणि गिधाडेच दिसायला लागलीत,  मुंबईतल्यासारखी.
.....आणि परवा गावाकडे जुन्या बसस्टण्डसमोरच्या टपरीवर कुणीतरी बोलत होतं -  " आता खेडीपण सुधारत चालली आहेत ".     

No comments:

Post a Comment