तिचा चेहरा काही आठवत नाही
पण एवढं आठवतंय अजूनही
ती खूप सुंदर हसायची
सौम्य निरागस आणि प्राणघातक
फारसं काही आठवत नाही
पण एवढं नक्की- ती म्हणाली
माझं तुझ्यावर प्रेम आहे
गडद गहिरं आणि अंतापर्यंत
तिचं नाव नाही आठवत आता
पण तिला भेटून परतल्यावर एकदा
रडलो होतो हमसून हमसून
टिपूर नितळ आणि प्रामाणिक
वचनही दिली असावीत तिने बरीच
पण काहीतरी झालं मग बहुतेक
आणि ती निघून गेली मधूनच
अनाकलनीय दुष्ट आणि तुटक
ही माझीच कल्पना अथवा सत्य
नाहीच सांगता येणार आता
पण एवढं मात्र खरं
तिला बोल मी लावलाच नाही
कधीही कशाबद्दलही आणि चुकूनही...
good one...
ReplyDeleteप्रत्येकाचेच एक स्वप्ना किंव्हा एक कल्पना जी हृदयाच्या कुठल्याश्या कोपर्यात दडवून ठेवलेली.....जी अविरत , अखंड लपूनच राहते ...कदाचित ...एका स्वप्ना प्रमाणे ???????
ReplyDelete